Thursday, May 9, 2024
Homeधुळेशेळ्या-मेंढ्यांसह ठेलारी समाजाचे बिर्‍हाड आंदोलन

शेळ्या-मेंढ्यांसह ठेलारी समाजाचे बिर्‍हाड आंदोलन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मेंढपाळ ठेलारी समाजाला त्यांच्या शेळ्या, मेंढ्या चारण्यासाठी 2005 मध्ये शासनाकडून काही हेक्टर वनजमीन चराईसाठी आरक्षीत करण्यात आली होती.

- Advertisement -

परंतु आजपर्यंत जमीन दाखविण्यात आली नाही. त्यामुळे आज शेळ्या, मेंढ्यांसह ठेलारी समाजातर्फे बिर्‍हाड आंदोलन करण्यात आले.

तसेच राजमाता अहिल्यादेवी पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप वनविभाग कार्यालय येथे झाला.

या आंदोलनात महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे, रामदास कारंडे, दिनेश सरक, मोतीराम गरदरे, विलास गरदरे, गोविंदा रुपनर, नाना कठळकर, धनराज केसकर अदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

एका शिष्ट मंडळाने उपवनसंरक्षक यांना निवेद दिले. त्यात म्हटले आहे की, मेंढपाळ ठेलारी समाज आपल्या परिवारासह मेंढ्यांना घेवून रानावनात राहून उपजिवीगा भागवित आहे.

परंतु 2006 मध्ये वनहक्क कायदा आल्यानंतर वनहक्क कायद्यानुसार वनजमीनवर अतिक्रम काढण्यास सुरुवात झाल्यामुळे मेंढी चराईरान मेंढी चारण्यासाठी कमी पडू लागले त्यामुळे मेंढपाळ ठेलारी समाज व वनहक्क अतिक्रमण धारक यांच्यात हक्कावरुन वाद सुरु झाले.

परंतु याकडे दुर्लक्षीत झाले आहे. मेंढपाळ ठेलारी समाजाच्या अनेक संघटनांनी निवेदने दिली. मोर्चा काढून आंदोलने केली.

तरी देखील मेंढी चराईसाठी आरक्षीत वनजमीन दाखविण्यात आलेली नाही. मेंढपाळ ठेलारी समाजाच्या मेंढ्यांसाठी आरक्षीत जमीन दाखवा अन्यथा बिर्‍हाड मोर्चास सामोरे जा असा इशारा देण्यात आला होता.

परंतु 5 ऑक्टोबर पर्यंत यावर निर्णय न घेतल्यामुळे ठेलारी महासंघाने आज बिर्‍हाड मोर्चा काढला, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या