Sunday, May 19, 2024
Homeधुळेजिल्ह्यात नव्याने 494 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नव्याने 494 पॉझिटिव्ह

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवीन 494 रूग्ण करोना बाधित रूग्ण आढळून आले. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 28 हजार 802 इतकी झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील 451 अहवालांपैकी 116 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपिड टेस्टेचे 27, शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्टचे 14, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 14, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 44 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तर भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 15, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 117, मनपा सीसीसी 15, मनपा युपीएचसी 7, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 8, एसीपीएमलॅबमधील 6 व खाजगी लॅबमधील 111 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 69 वर्षीय महिला (भाडणे, साक्री), 68 वर्षीय महिला (धुळे), 54 वर्षीय पुरूष (धुळे), 42 वर्षीय पुरूष (सहजीवन नगर, धुळे), उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथे दाखल 50 वर्षीय पुरूष (टेकवाडे, शिरपूर) व साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल 42 वर्षीय पुरूष (पन्हाळीपाडा, साक्री) यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 464 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या