Monday, May 6, 2024
Homeधुळेजिल्ह्यात नवीन 399 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नवीन 399 पॉझिटिव्ह

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना कहर सुरूच असून बुधवारी दिवसभरात नवीन 399 रूग्ण रूग्ण आढळून आले. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

बाधितांची एकुण संख्या 29 हजार 232 वर पोहोचली आहे. त्यापैकी 24 हजार 971 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्हा रुग्णालयातील 403 अहवालांपैकी 59 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 8, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 14, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 59, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 24, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 2, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 132 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा युपीएचसी 8, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 27, एसीपीएमलॅबमधील 20 व खाजगी लॅबमधील 46 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 40 वर्षीय पुरूष (साक्री रोड, धुळे), 45 वर्षीय पुरूष (शिरपूर) व जिल्हा रूग्णालयात दाखल 63 वर्षीय महिला (वाघापूर, साक्री) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 467 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या