Monday, May 6, 2024
Homeधुळेपिंपळनेर येथे विनामास्क फिरणार्‍या 55 जणांवर कारवाई

पिंपळनेर येथे विनामास्क फिरणार्‍या 55 जणांवर कारवाई

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

शहरात नियमांचे उल्लंघन करणार्‍यांसह विनामास्क फिरणार्‍या 55 जणांवर व एका वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

करोनाचा संसर्ग वाढत असतांना नागरिक बिनाधास्त वागत आहेत. दुपारी दोन नंतर विनामास्क फिरणारे, वाहनांवर गर्दी करून अवैध वाहतूक करणारे, एकाच वाहनांतून 20 ते 25 मजूरांची वाहतूक करणार्‍या वाहनावर पिंपळनेर सटाणा रस्त्यावर पिंपळनेर पोलीस, ग्रामपंचायत व महसूल कर्मचार्‍यांनी दंडात्मक कारवाई केली.

यावेळी 55 नागरिकांवर कारवाई करीत प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे साडेपाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई अप्पर तहसीलदार विनायक थविल, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलिस पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या