Monday, May 6, 2024
Homeधुळेकरोनामुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

करोनामुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

करोनामुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी 24 तासात 430 रुग्ण आढळले. जिल्ह्यात बाधितांची संख्या 29 हजार 662 वर पोहचली आहे.

- Advertisement -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे धुळे येथील 38 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरुष, शिंदखेडा येथील 58 वर्षीय पुरुष, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे बोराडी येथील 65 वर्षीय महिला आणि एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात नरडाणा येथील 65 वर्षीय पुरुष, साक्री येथील 56 वर्षीय महिला कोरोना कक्षात उपचार घेत होते.

उपचारादरम्यान या सहा बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 473 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 203 तर ग्रामीण भागात 270 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 19, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 15, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 23, भाडणे साक्री सीसीसीमधील 33, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 11, एसीपीएम लॅबमधील 21, खासगी लॅबमधील 53 असे गुरुवारी 24 तासात 386 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या