Sunday, May 19, 2024
Homeधुळेजिल्ह्यात नव्याने 486 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नव्याने 486 पॉझिटिव्ह

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना कहर कायम असून शुक्रवारी नव्याने तब्बल 486 बाधित रूग्ण आढळून आले. तर सोनगीर (ता. धुळे) एका 55 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकुण संख्या 30 हजार 148 इतकी झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील 296 अहवालांपैकी 73 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात एसआरपीएफमधील चौंघांचा समावेश आहे.

उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 22, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 16, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 54, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 12, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 30, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 154 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 591 पैकी 0, मनपा युपीएचसी 8, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 5, एसीपीएमलॅबमधील 28, खाजगी लॅबमधील 54 व जिल्ह्या रूग्णालयातील आणखी 30 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या