Sunday, May 19, 2024
Homeधुळेजिल्ह्यात नवीन 109 पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात नवीन 109 पॉझिटिव्ह रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येची आता सहा हजाराकडे वाटचाल सुरू आहे. आज 109 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार दरम्यान अर्थे (ता. शिरपूर) येथील 67 वर्षीय महिला, न्याहळोद (ता. धुळे ) येथील 55 वर्षीय पुरूष, वाघाडीतील (ता. शिरपूर) 55 वर्षीय पुरूष व देवपूरातील 50 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत एकूण 181 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील 156 अहवालांपैकी 46 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात साक्री रोड 1, रामदास नगर महिंदळे 2, धुळे 5, वैद्य नगर 5, कृषी कॉलनी 1, पाटील नगर 1, रामचंद्र नगर 1, पदमनाभ नगर 2, शीतल कॉलनी 1, सोनगीर 3, जापी 1, नेर 1, फागणे 2, नगाव 2, वडणे 4, जमजीरा साक्री 1, बाळापूर 1, जापी 1, देऊर 3, म्हसदी 2, नेर 2, खेडे 1, शिरूड 1, जुने धुळे 1 व चिमठाणेतील एका रूग्णाचा समावेश आहे.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 70 अहवालांपैकी 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.त्यात चौधरी गल्ली 1, शिरपुर 1, व्यंकटेश नगर 1, मारवाडी गल्ली 1, नारायण नगर 1, तर्‍हाडी 2, खुरखलीतील एक रूग्ण आहे. भाडणे ता. साक्रीतील सीसीसीमधील 60 अहवालांपैकी 19 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात जैताणे 8, पिंपळनेर 3, कावठे 5, दहीवेल 1, शिवाजी नगर साक्री 1, रुपाली नगर साक्रीतील एक रूग्ण आहे.

महापालिकेच्या पॉलिकेक्निक सीसीसीमधील 103 अहवालांपैकी 26 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. गल्ली नंबर 4 मध्ये 1, जुने धुळे 3, विष्णू नगर 2, वैद्य नगर 1, गुरुदत्त कॉलनी 2, राजाराम नगर 1, सप्तश्रृंगी कॉलनी 1, पदमनाभ नगर 3, रमाबाई चौक 1, चितोड रोड 1, वाडीभोकर रोड 2, अष्टविनायक नगर 2, जैताने 2, सुपडू अप्पा कॉलनी 2, गवळे नगर 1 व सुदर्शन कॉलनीतील एका रूग्णांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 अहवालांपैकी 10 अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शिरपूर 2, सोनगीर 1, जानकीराम शिरपूर 1, साक्री 2, शिंदखेडा 1, जुने धुळे 1 व धुळ्यातील दोन रूग्ण आहेत. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 5 हजार 895 वर पोहाचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या