Friday, May 3, 2024
Homeधुळेसरवडच्या शिक्षकाची फिल्मीस्टाईल हत्या

सरवडच्या शिक्षकाची फिल्मीस्टाईल हत्या

धुळे/सोनगीर – Songir – प्रतिनिधी :

अनैतिक संबंधातून तालुक्यातील सरवड येथील तरूण जि.प. शाळा शिक्षकाचा दोघा मित्रांनी नियोजीत कट रचून फिल्मीस्टाईलने खून केला.

- Advertisement -

सोनगीर पोलिसांनी अवघ्या चार दिवसात हा अपघाताचा किचकट गुन्हा उघडकीस आणला. दोघांना अटक करण्यात असून गुन्ह्यात वाढीव भादंवि 302 कलम लावण्यात आले आहे.

धुळे तालुक्यातील सरवड गाव शिवारात संदिपकुमार विश्वासराव बोरसे (वय 34 रा. सरवड) याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता.

दि. 26 जुन रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुयोग भानुदास बोरसे (वय 30 रा. सरवड) यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिसात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र मयताच्या कुटुंबियांकडून त्याचा घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर घटनास्थळी इनोव्हा गाडीचा लोगो तसेच बंफरचे पट्टयांचे तुकडे मिळुन आले होते. तसेच फिर्यादीकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सोनगीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश पाटील यांनी कसून तपास सुरू केला.

सीसीटीव्ही तिघे एकत्र

पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासादरम्यान धुळे शहरात नगावबारी परीसरातील हॉटेल सुरुची येथील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. त्यात गुन्हयातील मयत व राकेश उर्फ दादा मधुकर कुवर (वय 35 रा. सरवड) व शरद दयाराम राठोड (वय 36 रा. पाडळदे) असे तिघे इनोव्हा कारने या हॉटेल जवळ आल्याचे व त्याच कारने परत गेल्याचे दिसुन आले. त्यामुळे पोलिसांचा दोघांवर संशय बळावला. पोलिसांनी दोघांना अटक केली.

शिवीगाळ केल्याचा राग

पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली. त्यांनी दिलेली कबुली व साक्षीदाराकडून मिळालेली माहीतीवरुन राकेश कुवर याचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक सबंध होते. तसेच मयतास दारुचे व्यसन असल्याने मयत हा नेहमी दारू पिऊन अनैतिक संबंधाच्या कारणावरून राकेश यास शिवीगाळ करीत होता. त्याचा राग मनात धरून राकेश याने शरद याला सोबत घेवून संदीपकुमार याचा काटा काढण्याचे ठरविले.

यांनी केला तपास

पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, एसडीपीओ प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पाटील, उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी आरोपींविरूध्द तांत्रिक पुरावे गोळा करून गुणवत्तापुर्वक तपास करून गुन्ह्यातील सद्यस्थिती शोधून काढली. तपासात हवालदार सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतूल निकम, अजय सोनवणे, राम बोरसे, सायबर सेलचे संजय पाटील यांनी मदत केल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.

असा केला खून

राकेश व शरद अशा दोघांनी नियोजीत कट रचला. दि 26 जुन रोजी संदीपकुमार याला फोन करुन देवभाने गावाच्या फाटयावर पार्टीचा बहाना करून बोलावुन घेतले. तेथुन दोघांनी त्यांच्या सोबतच इनोव्हा गाडीने त्याला धुळे येथे आणले. हॉटेल सुरूची जवळील देशी दारूच्या दुकानातून त्याला दारु पाजली.

त्यानंतर त्याला गाडीव्दारे सरवड गावाचे फाट्यावर घरी पायी जाण्यासाठी सोडून दिले. नंतर राकेश याच्या सांगण्यावरुन शरद याने त्यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडीने संदीपकुमार यांच्या मागे जावून त्याला जोरदार धडक देवून त्याचा खून केला. त्यानुसार या गुन्ह्यात वाढीव 302, 120 (ब) भांदवि कलम लावण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या