Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळ्यात मुख्यालय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

धुळ्यात मुख्यालय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शेतीची हद्द कायम मोजणीसाठी शासकीय फिचे चलन काढून देण्यासाठी एक हजारांची लाच घेणार्‍या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकाला आज एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आज दुपारी ही सापळा कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

मौजे चिंचवार येथील शेतकर्‍याला स्वतःच्या मालकीच्या शेतीची हद्द कायम मोजणी करायची असल्याने त्यांनी धुळे येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.

तेव्हा जमिनीच्या मोजणीसाठी शासकीय फीचे चलन काढून देण्याचे मोबदल्यात कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक सुनिल वसंत धामणे (वय 53 रा.प्लॉट नं.1 एकविरा पार्क, आकाशवाणी केंद्रामागे, देवपूर) यांनी शेतकर्‍याकडे एक हजार रूपये लाचेची मागणी केली.

त्यामुळे शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज दुपारी सापळा रचुन सुनिल धामणे यांना तक्रारदार शेतकर्‍याकडून एक हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत साळवे, शरद काटके, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, राजन कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलानेकर, संदिप कदम, भूषण शेटे, महेश मोरे, गायत्री पाटील, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या