Monday, May 6, 2024
Homeधुळेमालपूरला नियमांचे उल्लंघन, वधु-वर पित्यांवर गुन्हा

मालपूरला नियमांचे उल्लंघन, वधु-वर पित्यांवर गुन्हा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील मालपूर येथे कोविडच्या नियमांचे उल्लंघन करत लग्न लावल्याप्रकरणी वधु-वर पित्यावर साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मालपूर येथे दि.6 रोजी वर पिता सुरेश बावास आणि वधु पिता संजय गोसावी यांनी लग्न सोहळा आयोजित केला होता. या लग्न सोहळ्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.

त्यांना लग्न सोहळ्यासाठी तहसील कार्यालयाकडून रितसर परवानगी घेवूनच समारंभ साजरा करावा, अशा सुचना मंडल अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवकांनी दिल्या होत्या.

मात्र या सुचनांकडे वधु आणि वर पित्याने दुर्लक्ष केले. त्यांनी चुकीमुळे एखाद्या संशयीत व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग पसरु शकतो.

अशी फिर्याद रामचंद्र रघुनाथ जाधव यांनी साक्री पोलिसात दिली आहे. त्यानुसार वधु-वर पित्याविरुध्द साक्री पोलिसात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हेकॉ ए.एन.पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या