Sunday, May 19, 2024
Homeधुळेदेशशिरवाडेत धुळ्यातील तरूणाचा खून

देशशिरवाडेत धुळ्यातील तरूणाचा खून

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे चौकातील पानटपरी पलटी केल्याने त्याचा जाब विचारल्याचा राग येवून सात जणांनी दोघांना जबर मारहाण केली. त्यात उपचारादरम्यान धुळ्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी सात जणांवर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

देशशिरवाडे ग्रामपंचायत चौका येथील रहिवासी हर्षल नरेंद्र महाजन या तरूणाची पानटपरी आहे. गावातील राहुल पुंजाराम सोनवणे व विशाल देविदास सोनवणे यांनी ती पानटपरी उलटवून दिली. याबाबत हर्षल महाजन व धुळे येथून आलेला नातेवाईक देवेंद्र महारु सावळे या दोघांनी पुंजाराम भानुदास सोनवणे यांना आमची टपरी का उलटवून दिली, असा जाब विचारला.

त्याचा राग येऊन दि. 8 रोजी सायंकाळी राहुल पुंजाराम सोनवणे, विशाल देविदास सोनवणे, गोविंदा देविदास सोनवणे, प्रकाश उत्तम सोनवणे, पुंजाराम भानुदास सोनवणे, देविदास भानुदास सोनवणे व उत्तम भानुदास सोनवणे सर्व (रा. देशशिरवाडे) यांनी महेंद्र महाजन व देवेंद्र साळवे या दोघांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

त्यात देवेंद्र साळवे यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला धुळे येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वरील सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला होता.

त्या वाढीव कलम 302 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 36 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील सर्व संशयीत आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भूषण हंडोरे, पीएसआय रवींद्र केदारे यांच्यासह पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या