Sunday, May 19, 2024
Homeधुळेअफूसह 11 लाखांचा मुद्येमाल जप्त, दोघे ताब्यात

अफूसह 11 लाखांचा मुद्येमाल जप्त, दोघे ताब्यात

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

सुरत- नागपूर महामार्गावरील तालुक्यातील आनंदखेडा शिवारात हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी अफुसह कार असा एकुण 10 लाख 83 हजारांचा मुद्येमाल जप्त केला.

- Advertisement -

तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक फरार झाला. याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाने काल दि. 9 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

आनंदखेडे शिवारातील भारव्दाज पेट्रोल पंपाजवळील हॉटेल चौधरी हाईवे हॉटेल काठीयावाडी येथे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. तपासणीत तेथे अफु नावाचा अंमली पदार्थाचा साठा मिळून आला. एकुण 59 हजार 760 रूपये किंमतीचा बोंड फुटलेली बारिक तुकडे केलेले 9.96 किलो अफुचा साठा जप्त केला.

तसेच अफुची बोंड ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली दहा लाख रूपये किंमतीची कार (क्र. एमएच 14 एएच 3324) व 10 हजारांचे ग्राइरडर मशीन, 4 हजारांचा एक लहान व मोठा इलेक्ट्रीक वजन काटा, दहा हजारांचे दोन मोबाईल असा एकुण 10 लाख 83 लाख 760 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

तर पाबुराम दुधाराम जाट (वय 26 रा. निबलकोट ता. शेनधरी जि.बाडमेर पोलीस ठाणे ह.मु आनंदखेडा भारव्दाज पेट्रोल पंपाजवळ हॉटेल चौधरी, धुळे) व वेटर प्रभुला भक्ताराम जाट (वय 22 रा. रावतसर ता. जि. वाडमेर, राजस्थान) यांना ताब्यात घेतले.

तर अर्जुनसिंग कल्लाराम बिण्णोई (रा. सासोर जि. जालोर, राजस्थान) हा फरार झाला. याप्रकरणी पोना पवन मंडाले यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांवर एनडीपीएस अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या