Sunday, May 19, 2024
Homeधुळेविवाहितेचा वशीकरण करण्याचा प्रयत्न

विवाहितेचा वशीकरण करण्याचा प्रयत्न

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

विवाहितेचा छळ करून तिला वशीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सहा जणांवर शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत प्रियंका गौरव पाटील (वय 29 रा. गाडगेबाबा चौक, अमोल प्लाझा, देवेंद्र नगर, जळगाव व ह.मु पाटण ता. शिंदखेडा) या विवाहितेने शिंदखेडा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. 14 जुन 2020 रोजी तिचे लग्न झाल्यानंतर दोन दिवसांपासूनच लग्ना हुंडा व श्रीधन कमी दिले असे टोमणे मारत पैशाची मागणी करत तिचा सासरच्यांनी छळ सुरू केला.

सासु, सासरे सांगतील तशाच पध्दतीने वागावे, यासाठी जादुटोणा करणारे उस्मान बाबा यांच्याकडून गोळ्या पावडर व औषधी घेवून तिला वशीकरण करण्याचा प्रयत्न केला. तिला औषधी घेण्यास भाग पाडले.

तर पती गौरव याने प्रियंका ही गर्भवती असतांना तिला गर्भपात करण्याचे औषध आणून न कळत दिल्याने तिचा गर्भपात झाला. तसेच माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी करून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला.

त्यावरून पती गौरव विलास पाटील, सासरे विलास विश्वास पाटील, सासु वंदना विलास पाटील, ननंद भावना गिरीश पाटील, नंदोई गिरीश अजबराव सोनवणे सर्व (रा. गाडगेबाबा चौक, जळगाव) व उस्मानबाबा (रा. जळगाव) यांच्याविरोधात भादंवि कलम 498 अ, 313, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र जादुटोणा कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय गजानन गोटे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या