Thursday, May 2, 2024
Homeधुळेदसर्‍याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली

दसर्‍याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

करोना महामारीला बाजूला सारुन दसर्‍याच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली.

- Advertisement -

दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे सराफ बाजारातही गर्दी दिसून आली. दरम्यान झेंडूचे फुले, ऊस आणि आपटेची पाने विक्रेत्यांनी शहरात ठिकठिकाणी दुकाने थाटली. तर कोरोना महामारीमुळे शहरासह जिल्ह्यातील रावण दहन कार्यक्रम रद्द करण्यात आला.

कोरोना महामारीमुळे शासनाने निर्बंध घातले असले तरी ते निर्बंध झुगारुन दसर्‍याच्या पुर्वसंध्येला नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. दुपारपासून बाजारपेठेत जास्त प्रमाणात गर्दी दिसून आली.

दसरा सण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे सोने, महागडी वस्तू, फर्निचर, टीव्ही, फ्रिज, घर खरेदी केले जाते.

आज सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी दिसून आली. तसेच इलेक्ट्रॉनिक्स दुकानातही ग्राहकांची गर्दी झाली होती.

दसर्‍याला नवीन कपडे खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे कपडे खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांनी भर दिला. तसेच दसर्‍याच्या पुर्वसंध्येला मिठाई विक्रेत्यांनी दुकाने सजविली होती.

झेंडूची फुले 100 रुपये किलो

दसरा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे दुकाने व घरांवर फुलांचे तोरण लावले जाते. त्यामुळे झेंडूच्या फुलांना मागणी जास्त असते.

दसर्‍याच्या पुर्वसंध्येला फुले विक्रेत्यांनी शहरात ठिकठिकाणी दुकाने थाटली. यंदा अतिवृष्टीमुळे फुलांची शेती उद्ध्वस्त झाली.

त्यामुळे फुलांच्या दरांमध्ये वाढ झाली असून 100 ते 120 रुपये किलोदराने झेंडूंच्या फुलांची विक्री होत आहे. पुर्वसंध्येलाच फुले खरेदी करण्यावर काहींनी भर दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या