Tuesday, May 7, 2024
Homeधुळेधुळ्यातील आपत्ती दलाचे जवान ठरले 'देवदूत'

धुळ्यातील आपत्ती दलाचे जवान ठरले ‘देवदूत’

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीला आलेले पुराचे पाणी गावात शिरले. त्यामुळे…

- Advertisement -

पवना खु., मांगेली, पवना मौजे या गावांमध्ये अडकुन पडलेल्या 138 नागरिकांना पुरातून सुखरुप बाहेर काढण्याची कामगिरी धुळ्यातील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी केली आहे. या जवानांचा समादेशक संजय पाटील यांनी प्रशस्तीपत्र व बक्षिस देवून गौरव केला.

धुळ्यातील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या पोलीस निरिक्षक सी.बी. पारस्कर व पोलीस उपनिरिक्षक डी.आर. भोसले यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे रवाना करण्यात आल्या होत्या.

यात चार अधिकार्‍यांसह 55 कर्मचार्‍यांचा समावेश होता. दोन जिल्ह्यांमध्ये या कर्मचार्‍यांनी मदत कार्य करुन पुरात अडकेलेल्या लोकांना बाहेर करीत त्यांच्यासाठी ते देवदूत ठरलेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या