Friday, May 3, 2024
Homeधुळेपीक कर्ज वाटपात धुळे-नंदुरबार जिल्हा बँक प्रथम

पीक कर्ज वाटपात धुळे-नंदुरबार जिल्हा बँक प्रथम

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30 दिवसात विक्रमी 174 कोटी रूपये पिक कर्ज वाटप केले असून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे कर्ज वाटप करणारी बँक ठरली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे आणि संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनानुसार दि.12 एप्रिलपासून पिक कर्ज वाटपाला सुरुवात झाली. दि. 13 मे पर्यंत म्हणजेच महिनाभरात बँकेने जिल्ह्यात विक्रमी पिक कर्ज वाटप केले आहे.

धुळे जिल्ह्यात 97 टक्के, नंदुरबारमध्ये 111 टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. 174 कोटी रुपयांचे कर्ज शेतकरी सभासदांना वर्ग केले असून गरजेनुसार शेतकर्‍यांनी 104 कोटी रुपये आपआपल्या बँक खात्यातून काढलेल्या या कर्ज वाटपाचे नियोजन करताना बँकेने सर्व प्राथमिक आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे कमाल मर्यादा पत्रक मार्च 2021 मंजूर करुन संबंधीत संस्थांना कर्ज मंजुरी पत्रक पाठविली.

त्यामुळे यासर्व संस्थांना एप्रिल पासूनच कर्ज वाटपाची तयारी पुर्ण करुन त्याचे याद्या शाखा पातळीवर तयार करुन प्रत्यक्ष कर्जवाटपास सुरुवात करता आली. बँकेने सर्व पिककर्ज रुपे, केसीसी कार्डमार्फत वाटप केले आहे.

म्हणूनच शेतकर्‍यांना एटीएममधून रक्कम काढता आली. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमार्फत मायक्रो एटीएम पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे. बँकेची एटीएम सेवा देखील चालू आहे. मध्यंतरीच्या काळात या सेवेला कनेक्टीव्हीटीमुळे तांत्रीक अडचण निर्माण झाली होती.

त्यासाठी बँकेने मुंबई, पुणे, नाशिक येथून कनेक्टीव्हीटीची अडचण युध्द पातळीवरुन दुरु करुन शेतकरी सभासदांना ताबडतोब पिक कर्ज उपलब्ध होईल, यासाठी कामकाज केले आहे. जिल्हा बँकेच्या दोन मोबाईल, एटीएम व्हॅन असून त्याद्वारे मागणीप्रमाणे व प्रत्यक्ष कामकाज आराखड्यानुसार प्रत्येक गावात पीक कर्ज रोखीने उपलब्ध करुन दिले आहे.

तर नवीन पिक कर्ज घेण्यासाठी पात्र व्हावे

शेतकरी सभासदांनी मागील वर्षाचा थकीत पिककर्जाचा भरणा त्वरेने करुन नवीन वाढीव पीक कर्ज घेण्यासाठी पात्र व्हावे, असेही आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या