Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसाक्री : पोलिसांना धमकी,नगराध्यक्षांशी वाद

साक्री : पोलिसांना धमकी,नगराध्यक्षांशी वाद

साक्री पोलिसात पाच जणांवर गुन्हा

साक्री  – 

नगराध्यक्षांशी वाद व पोलीसांना धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

यासंदर्भात पोलीसांनी दाखल केलेल्या फिर्याद नुसार रामजी नगर परिसरातील गढी भिलाटी येथे राहणार्‍या गोविंदा सोनवणे, गणेश सुर्यवंशी, दशरत भवरे, राहूल बागुल, मिथुन सोनवणे यांनी गढी भिलाटी परिसरातील महिलांना एकत्र करून जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्य पुरवठा न करण्याचा गैर समजुतीतून शेकडो महिलांना नगराध्यक्ष अरविंद भोसले यांच्या घरी येवून वाद घातला. याबाबत माहिती साक्री पोलीस ठाण्याचे पीआय देविदास डुमणे यांना देण्यात आली.

त्यानंतर पोलीस फौजफाटा नगराध्यक्ष यांच्या घराजवळ दाखल झाला. त्यावेळी पोलीसांना ही मोठमोठ्या आवाजाने आरडाओरडा करत धक्काबुक्की करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. पोलीस समजावून सांगण्याचा प्रयत्न करून ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पाच जणांविरोधात सरकारी कामात अडथळा व 144 चे कलम उल्लंघन केल्याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या