Thursday, May 2, 2024
Homeनगरडिझेल प्रकरणाचा तपास उपअधीक्षक मिटके यांच्याकडे

डिझेल प्रकरणाचा तपास उपअधीक्षक मिटके यांच्याकडे

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट डिझेल प्रकरणात मुळाशी जाण्यात अपयशी ठरलेले तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून तपास काढण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.

शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 2 हजार लीटर बनावट डिझेल जप्त केले होते. याप्रकरणी दोन आरोपींना अटक झाली आहे. छापा टाकला त्या दिवशी एका आरोपीला अटक झाली होती. तर उपअधीक्षक ढुमे यांनी एकाला अटक केली आहे. डिझेल प्रकरणात गैरवर्तनाचा ठपका ठेऊन एक अधिकारी व सात कर्मचारी निलंबित केले आहे.

सुरूवातीला भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे तपास होता. त्यांच्याकडून तपासात प्रगती न झाल्याने तो शहर उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला होता. तपासाला गती न मिळाल्यानेच हा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ढुमे यांच्याकडून मिटके यांच्याकडे दिल्याची चर्चा आहे. हे प्रकरण गंभीर असतानाही गेल्या पंधरा दिवसांत या गुन्ह्यात केवळ दोघांचा अटक झालेली आहे.

तपासात तीन आरोपींची नावे निष्पन्न झाले आहेत. दरम्यान याबाबत मिटके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रविवारी रात्री माझ्याकडे तपास आला आहे. याप्रकरणाची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या