Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत डिझेलही 'शंभरी'च्या वाटेवर!

औरंगाबादेत डिझेलही ‘शंभरी’च्या वाटेवर!

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद शहरात पेट्रोलचे दर (Petrol rates) १०६ रुपये ८७ पैशांपर्यंत पोहोचले असून, डिझेलचे दर ९८.२१ प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी ७ जून रोजी डिझेलचे दर ६९.६९ रुपये होती. वर्षभरात (Diesel) डिझेलने ९९ रुपयांचा टप्पा पार केला. गेल्या वर्षभरात ही वाढ २८ रुपये ५२ पैशांची झालेली आहे. पंधरा दिवसांत ही दरवाढ कायम राहिल्यास शहरात डिझेलच्या किंमती १०० रुपये पार करतील, अशी शक्यता आहे.

- Advertisement -

दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. ही दरवाढ २ मेपासून सुरू झालेली आहे. त्यापूर्वी डिसेंबर ते २८ फेब्रुवारी अशी सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती. तर, एक मार्च ते तीन मेपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. या दोन महिने तीन दिवसांच्या काळात डिझेलचे दर ४० पैशांनी कमी करण्यात आले होते. तीन मे रोजी शहरात डिझेलचे दर ८८ रुपये ९५ पैसे होते. मात्र, चार मे रोजी डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ करण्यात आली. यानंतर ही दरवाढ सुरू झाली. चार मे ते चार जून या दरम्यान डिझेलच्या दरात तब्बल नऊ रुपये २६ पैशांची वाढ झालेली आहे. तर सहा जानेवारी ते ४ जून या काळात डिझेलच्या दरात १६ रुपये २१ पैशांची वाढ झाली. ही वाढ नियमित सुरू असल्याने, इंधनावर आधारित असलेल्या उद्योगांची चांगलीच अडचण झालेली आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसह ट्रॅव्हल्स क्षेत्रही अडचणीत आले आहे. याचा मोठा फटका मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या