Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगावच्या जुगार्‍यांना अटक

नगर, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगावच्या जुगार्‍यांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्याचा झन्ना मन्ना जुगार खेळणार्‍या 17 जणांना डीआयजीच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये तीन व्यापारी, एक वायरमनचाही समावेश आहे. नगरजवळील जेऊर गावाच्या शिवारात बुधवारी मध्यरात्री पोलिसांच्या विशेष पथकाने ही रेड केली. पथकाने टाकलेल्या छाप्यात कार, मोटारसायकली आणि रोकड असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या जुगार्‍यांमध्ये नगर शहरातील व्यापार्‍याचाही समावेश असून विजय चांदमल मुनोत (रा.विनायकनगर) असे त्याचे नाव आहे. याशिवाय मुकेश नथुराम मनोदिया (रा. आंबेडकर कॉलनी, भिंगार), महेश भागवत साळवे (पेंटर, बालिकाश्रम रोड, नालेगाव), प्रतीक दादासाहेब हिवाळे (रा. हरेगाव, श्रीरामपूर), शौकत दिलावर शेख (रा.पानटपरी, इंदिरानगर, पाथर्डी), आयुब अब्बास शेख (रा.व्यापार, नाथनगर, पाथर्डी), जमीर निजाम शेख (रा. शिवाजीनगर, अहमदनगर), अविनाश बाळासाहेब तोडमल (रा.बायजाबाई जेऊर), मधुकर नाथाजी मोहिते (वायरमन, कल्याण रोड, शिवाजीनगर), प्रणव सुनील पंचमुख (रा.आंबेडकर कॉलनी, भिंगार), दत्तात्रय रामदास गवळी (रा. वडेगाव, नेवासा), समीर जाकी शेख (रा.व्यापार, मुकुंदनगर, नगर), अझरूद्दीन चांद तांबोळी (रा. माळीगल्ली, शेवगाव), अश्पाक कय्यूम शेख (रा.नाथनगर, पाथर्डी), दीपक रोहिदास पवार (रा.तापेवाडी, जेऊर), सागर आनंद रणदिवे (रा.सिध्दार्थनगर, नगर) आणि मतीन खलील सय्यद (रा. जुना मुकुंदनगर, नगर) अशी अटक केलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

- Advertisement -

या जुगार्‍यांकडून 2 लाख 68 हजार 360 रुपयांची रोकड, आठ लाख रुपयांच्या कार, 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली, अडीच हजार रूपयांची जुगाराची साधने असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जेऊर गावाच्या शिवारात चाफेवाडी रोडलगत असलेल्या अंबादास म्हस्के यांच्या शेतात 52 पत्त्याच्या कॅटमधील अंकावर आणि चित्रावर झन्ना मन्ना हा जुगार सुरू होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……………………………..

शेवगाव पाठोपाठ जेऊरला छापेमारी

डीआयजी प्रताप दिघावकर यांच्या पथकाने यापूर्वी श्रीरामपूर, शेवगाव येथे छापेमारी करत अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे. त्यानंतर आता नगर तालुक्यातही रेड करत पाथर्डी, शेवगाव, नगर, श्रीरामपूर येथील जुगार्‍यांना अटक केली आहे. एसपी ऑफिसपासून अगदी जवळ असणार्‍या जेऊर गावात थेट डीआयजीच्या पथकाने रेड केल्याने नगर पोलिसांविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या