Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमDigital Arrest : भामट्यांकडून इंजिनीअरला 8.80 लाखांचा गंडा

Digital Arrest : भामट्यांकडून इंजिनीअरला 8.80 लाखांचा गंडा

डिजिटल अरेस्टची धमकी || मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तुमच्या नावाने एक अवैध पार्सल आले आहे, तुमच्यावर मनी लॅन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे आणि तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात अशी भीती घालून, मुंबई सायबर सेलचे अधिकारी असल्याचे भासवणार्‍या भामट्यांनी शहरातील 51 वर्षीय सिव्हील इंजिनीअरला तब्बल 8 लाख 80 हजार रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ब्लू डार्ट सर्व्हिस आणि मुंबई सायबर सेलच्या नावाने हा संपूर्ण बनाव रचण्यात आला. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात दोन मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फसवणूक झालेल्या सिव्हील इंजिनीअरने शुक्रवारी (31 ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावेडी परिसरात राहणार्‍या सिव्हील इंजिनीअरला 24 ऑक्टोबर रोजी सकाळी राज आनंद (ब्लू डार्ट सर्व्हिस, मुंबई) या नावाने एका व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून संपर्क करण्यात आला. तुमच्या नावाने एक अवैध पार्सल पाठवले जात आहे, असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंग, हवाला आणि ओळख चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगून भामट्याने फिर्यादीस मुंबई सायबर सेलशी संपर्क करण्यास सांगितले. घाबरलेल्या फिर्यादीने विजय पाल (मुंबई सायबर सेल) असे नाव सांगणार्‍या दुसर्‍या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर व्हीडीओ कॉल केला.

YouTube video player

तेव्हा विजय पाल याने तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, असे जाहीर केले. या भामट्यांनी फिर्यादीवर दबाव आणला. तुमचे बँक खाते चौकशीसाठी तपासावे लागेल, असा बहाणा करून, फिर्यादीच्या कान्हूर पठार मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीमधील बचत खात्यातील 8 लाख 80 हजार रुपये दुसर्‍या एका बँक खात्यावर (कुमार एजन्सीज, बंधन बँक) पाठवण्यास भाग पाडले. चौकशी पूर्ण होताच हे पैसे तुम्हाला परत मिळतील, असे खोटे आश्वासनही दिले. हा फसवणुकीचा प्रकार 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान घडला. पैसे परत न मिळाल्याने आणि भामट्यांशी संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे इंजिनीअरच्या लक्षात आले. अखेर 31 ऑक्टोबर रोजी त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...