Monday, May 6, 2024
Homeनगरसोयर्‍या-धायर्‍यांच्या दहशतीला जशास तसे उत्तर देऊ

सोयर्‍या-धायर्‍यांच्या दहशतीला जशास तसे उत्तर देऊ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

15 वर्षांपासून केडगामध्ये गुंडगिरी विरोधात लढा देत आहोत. मंगळवारी केडगावमध्ये झालेली दगडफेक किरकोळ होती, त्याला आम्हीही प्रत्युत्तर दिले आहे. यापुढील काळात मात्र सोयर्‍या-धायर्‍यांच्या दहशतीला, गुंडगिरीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

- Advertisement -

सातपुते म्हणाले, गेल्या 10 वर्षांत शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरापेक्षा खेड्यात चांगले रस्ते आहेत. शहराच्या या अवस्थेविरोधात आवाज उठविणार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आजही हे सत्र सुरूच आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणार्‍यांना दडपशाही, गुंडगिरी करून आवाज दाबला जातो. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. परंतु दुसरा कोणी उभा राहूच नये, जे हवे ते आपल्यालाच हवे या भावनेतून हा खेळ सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेला वाद हा कोणा पक्षाच्या विरोधात नसून प्रवृत्तीविरोधात आहे. मंगळवारच्या प्रकरणात चार, सहा मंडळी तोंड बांधून आली आणि त्यांनी किरकोळ दगडफेक केली. त्याला आम्हीही प्रत्युत्तर दिले. त्यांनी तोंड न बांधता समोर यावे, मग काय होते ते पहावे असे खुले आव्हानही त्यांनी दिले. पिंपळगाव येथील लग्न समारंभात माझ्या मुलाला धक्का मारल्याने हा सारा प्रकार घडला पण त्याचे उत्तर त्यांना मिळाले आहे व यापुढेही मिळत राहील, असे सातपुते यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, सचिन जाधव, सुनील लालबोंद्रे, आनंदराव शेळके उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या