Tuesday, December 3, 2024
Homeजळगावदिलीप वाघ यांनी घेतले ज्येष्ठांचे आशीर्वाद

दिलीप वाघ यांनी घेतले ज्येष्ठांचे आशीर्वाद

पाचोरा । प्रतिनिधी
पाचोरा भडगाव विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच उमेदवारांनी घरोघरी जाऊन आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. त्यातच पाचोरा भडगाव विधानसभेचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार दिलीप वाघ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

नुकतेच त्यांनी लोहटार व वडजी या गावी आपली प्रचार रॅली काढली. दिलीप वाघ यांनी जेष्ठांचे आशीर्वाद घेत आपला प्रचार जोरात सुरू करून प्रचारात आघाडी घेतली आहे. दिवंगत माजी आमदार ओंकार आप्पा वाघ यांच्या काळातील अनेक वृद्ध मतदार आजही ओंकार अप्पा वाघ यांच्या बाबतीत गौरव उद्गार काढतात आपल्या वडिलांची पुण्याई नक्कीच आपल्याला कामी येईल असे ज्येष्ठ मतदार प्रचारादरम्यान दिलीप वाघ यांना सांगत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या