Friday, November 22, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : निवडणूक खर्चात डॉ. भारती पवार आघाडीवर

Loksabha Election 2024 : निवडणूक खर्चात डॉ. भारती पवार आघाडीवर

मतदान झाल्यानंतर २२ तारखेला सर्व हिशेब देण्याच्या सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha) मतदारसंघांतर्गत निवडणूक लढविणार्‍या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी २५ लाख तर महाविकासआघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी १७ लाख रपये खर्च झाल्याची नोंद दिली आहे. हा खर्च १४ तारखेपर्यंतचा असून संपूर्ण निवडणुकीचा खर्च (Election Expenses) निवडणूक झाल्यानंतर २२ मे रोजी सादर करण्याच्या सुचना या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. सर्वच दहा उमेदवारांच्या खर्च नोंदवहीसह आवश्यक कागदपत्रांची तिसरी तपासणी खर्च निरीक्षक मुकांबिकेयन एस. आणि निधी नायर यांनी केली.

- Advertisement -

शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी येथे खर्च ताळमेळ बैठक पार पडली. सदर तपासणीनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहा उमेदवारांचा (Candidates) खर्च अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली. उमेदवारांच्या तिसर्‍या खर्च तपासणीसाठी सहायक नोडल अधिकारी बाबासाहेब शिंदे, क्षेत्रीय नोडल अधिकारी गोविंद कतलाकुटे, लेखांकन चमू नियंत्रक जलपत वसावे, सहायक खर्च निरीक्षक (मुख्यालय) प्रसाद कुलकर्णी यांसह लेखा अधिकारी राजेंद्र कोठावदे, लखीचंद बाविस्कर, खलील पटेल, नितीन नंदन, संतोष नायर, अनिल उमरे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, सर्व उमेदवारांनी सोमवार (दि.२० मे) म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंतचा खर्चाचा तपशील त्यांची खर्च नोंदवही व इतर अनुषंगिक कागदपत्रांसह बुधवार (दि. २२ मे) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात खर्च सादर करण्याचे आवाहन खर्च निरीक्षक यांनी केले आहे. या अहवालानुसार डॉ. भारती पवार यांचा २५ लाख १६ हजार तर भास्कर भगरे यांचा १६ लाख ९९ हजार रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. तर आज नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) खर्चाचा ताळमेळ घेतला जाणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या