Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याDindori Leopard News : तब्बल ५० दिवसानंतर वनविभागाला नर बिबट्याला पकडण्यात यश

Dindori Leopard News : तब्बल ५० दिवसानंतर वनविभागाला नर बिबट्याला पकडण्यात यश

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

वनारवाडी (Vanarwadi) येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) ठार झालेल्या तरुणीच्या (Girl) मृत्यूनंतर तब्बल ५० दिवसांनी नर बिबट्याला (Leopard) पकडण्यात वनविभागाला (Forest Department) यश आले आहे.

- Advertisement -

वनारवाडी येथील चव्हाण वस्तीवर घटनास्थळावर एक नर बिबट्या महिनाभरापासून दर्शन देत होता. मात्र, पिंजऱ्यात (Cage) येत नव्हता. अखेर वनविभागाने शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर तो बिबट्या आज (शनिवार) पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. ग्रामस्थ, स्थानिक यांनी देखील संयम ठेवून सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले.

YouTube video player

दरम्यान, परिसरात बिबट्याची संख्या अधिक असल्याने सर्वांनी शेती कामे करताना सजग राहावे, असे आवाहन वनविभागाचे अधिकारी अशोक काळे यांनी केले. वनारवाडी,दिंडोरी मडके,जाम हातनोरे ,निळवंडी परिसरात बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्न वरिष्ठांच्या निर्देशांनुसार सुरु राहणार असल्याचे अशोक काळे (Ashok Kale) यांनी सांगितले.

सप्तशृंगी गडावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला

काल (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास सप्तशृंगी गडावर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सप्तशृंगी गडावर सध्या बिबट्याचा वावर दिसून येत असून,काही ग्रामस्थांना गडावरील रस्त्यावर बिबट्या मृत अवस्थेत दिसला. यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केले असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी वनविभागात नेले. तर बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...