Friday, May 3, 2024
Homeजळगावखानापूर येथे पावणे तीन लाखाचा डिंक जप्त

खानापूर येथे पावणे तीन लाखाचा डिंक जप्त

रावेर Raver|प्रतिनिधी

खानापूर (Khanapur) (ता.रावेर) येथे अवैधरित्या (Illegally stored) साठवण्यात आलेला डिंक (Dink) वनविभागाने (Forest Department) केलेल्या कारवाई (action) मध्ये जप्त (confiscation) करण्यात आला आहे.

- Advertisement -

धुळे प्रादेशिक विभागाचे वन संरक्षक दि वा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे व रावेर आरएफओ अजय बावणे यांनी खानापूर येथील शहनवाज सय्यद जमील यांचे भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोडाऊनची तपासणी केली असता, अवैधरीत्या ६७ गोण्यामध्ये साठवून ठेवलेला २३९० किलो डिंक त्याची किंमत २ लाख ६२ हजार ९०० रुपये जप्त करून भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

या कार्यवाहीत वनपाल अहिरवाडी राजेंद्र सरदार ,वनपाल रावेर रवींद्र सोनवणे,वनपाल सहस्त्रलिंग अरविंद धोबी,वनपाल पाल दीपक रायसिंग,वनरक्षक संभाजी सूर्यवंशी राजू बोंडल रमेश भुतेकर,संजय राजपूत,युवराज मराठे,सुधीर पटणे, लेदा पावरा,मुकेश तडवी, आयशा पिंजारी, कल्पना पाटील,सविता वाघ,वाहन चालक सुनील पाटील,विनोद पाटील यांचा सहभाग होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या