Monday, May 6, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील 8 पोलीस अधिकारी,कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक पदक

जिल्ह्यातील 8 पोलीस अधिकारी,कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक पदक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महाराष्ट्र पोलिस विभागात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून जिल्ह्यात आठ पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

शासनाच्या गृहाविभागाच्या निर्देशानुसार दरवर्षी महाराष्ट्र पोलिस विभागातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक सन्माचिन्ह देवून गौरविले जाते.

सन 2020 या वर्षात पोलिस महासंचालक पुरस्कारासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती तयार करण्यात आली होती.

या समितीत प्रमुख म्हणून अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी पोलीस अधीक्षक डी.एम. पाटील, पोलीस निरीक्षक बापू रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे यांचा समावेश होता. समितीने सेवापटाची छाननी करुन दहा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे सेवापट पोलीस महासंचालक विभागाकडे पाठविले होते. त्यानुसार आठ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

हे आहेत मानकरी

उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्यातील आठ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहेत.

यात जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक लिलाकांत महाले, शिवाजी पाटील, आर्थीक गुन्हे शोखेचे सहा. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपविभागीय कार्यालयातील पोहेकॉ विजय काळे, स्थानिक गुन्हे शोखेतील पोहेकॉ सुनिल दामोदरे, धूळे येथे बदलून गेलेले पोना मनोज मराठे, पारोळा पोलीस स्टेशनचे पोना महेश पाटील आणि स्थानिक गुन्हे शोखेचे पोना संदिप सावळे यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या