Friday, May 3, 2024
Homeधुळेदुबार पेरणी करूनही निराशाच ; शेतकऱ्यानं उजललं हे पाऊल...

दुबार पेरणी करूनही निराशाच ; शेतकऱ्यानं उजललं हे पाऊल…

धुळे | प्रतिनिधी Dhule

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील मांडळ येथे दुबार पेरणी करून पावसाअभावी पिकच न आल्याने निराश झालेल्या शेतकर्‍याने (Farmers) गळफास घेत आत्महत्या केली.

- Advertisement -

या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे, शेनपडू बंडु देवरे (वय ६७ रा. मांडळ ता.शिंदखेडा) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांनी जुनच्या आठवड्यातच व त्यानंतर दोन ते तीन वेळेस पेरणी केली. परंतू पाऊसच आला नाही. पाण्याअभावी पिकच आले नाही. त्यामुळे ते हताश झाले होते. त्यातूनच त्यांनी काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतातील घराच्या ओट्यावरील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास (Suicide) घेतला. त्यांना नातेवाईकांनी दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात (Dondaicha Sub-District Hospital) दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत माधवराव विलास देवरे यांच्या माहितीवरून दोंडाईचा पोलिसात (Police) नोंद झाली आहे. तपास पोहेकॉं महाजन करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या