Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDisha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण; हत्या की आत्महत्या?...

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण; हत्या की आत्महत्या? मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय

मुंबई | Mumbai
अभिनेता सुशांत राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने पाच वर्षानंतर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन तिच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशाच्या मृत्यूवरुन आरोप प्रत्यारोप होत असतानाच या प्रकरणात आता नवे ट्विस्ट आला आहे. या नवीन दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पाच वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात नित्यनवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिशाच्या पार्थिवाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. आता मालवणी पोलिसांनी या प्रकणामध्ये तयार केलेला क्लोजर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे झाले आहेत.

- Advertisement -

दिशा सालियानच्या वडिलांचे विवाह बाह्य संबंधामुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. कष्टाने कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलली होती. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
मालवणी पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दोन प्रोजेक्ट हातातून गेल्याने आणि वडील पैसे मागत असल्याने तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नोंदवलाय. मित्रांचे जबाब घेऊन पोलिस या निष्कर्षावर पोहचले. ४ फेब्रुवारी २०२१ ला मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. जुन्या क्लोजर रिपोर्टमुळे दिशाच्या मृत्यूला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

सतीश सालियनने क्लोजर रिपोर्टर नाकारला
सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप नोंदवला आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार केला होता तर तो कोर्टात सादर केला का, केला नाही तर का केला नाही, असा सवाल वकील ओझांनी उपस्थित केला आहे. कोर्टात सादर न करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टला काहीही अर्थ नाही, असाही दावा निलेश ओझांनी केला आहे. तसेच दिशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरावे असे त्यांनी म्हटले आहे. आता याप्रकरणात सतीश सालियान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालवणी पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टने या प्रकरणाची दिशाच बदलल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने सखोल तपासाची मागणी करण्यात येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वाढत्या वयानुसार निरोगी राहणासाठी काय करावे ?

0
वाढत्या वयाबरोबर अनेक समस्या येतात. योगासनामुळे या समस्या दूर होऊ शकतात. माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याच्या शरीरात वेगवेगळे बदल येऊ लागतात ....