Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रिपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये बाचाबाची; मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी

मंत्रिपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये बाचाबाची; मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी

मुंबई | Mumbai

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली. मात्र अनेक इच्छुकांना दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटातील इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले…

- Advertisement -

मंगळवारी मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आमदारांमधील भांडणाची माहिती मिळताच नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुंबईत परत आले. तसेच, शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Rain Update : कोकणात रेड अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज, नाशिकचं काय?

दरम्यान, लवकरच मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार असल्याची अपेक्षा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवारांच्या एन्ट्रीने धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. तर गरज नसतांना राष्ट्रवादीला सोबत का घेण्यात आले असा प्रश्न पडला असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहे. तसेच माझ्यासह अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचेदेखील शिरसाट यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नको हा दुरावा…!

- Advertisment -

ताज्या बातम्या