Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedवारकर्‍यांचा हिरमोड

वारकर्‍यांचा हिरमोड

त्र्यंबकेश्वर । मोहन देवरे | Trimbakeshwar

करोना (corona) संक्रमनाच्या लाटेमुळे सलग दुसर्‍या वर्षीही श्री संंत निवृत्तीनाथ महाराज (Shri Sant Nivruttinath Maharaj) यात्रा रद्द झाल्याने वारकरी (Warakari) वर्गाचा हिरमोड झाला आहे. तर नागरिकात नाराजी पसरली आहे. तथापी मर्यादित संख्येने उपस्थित राहून संत निवृत्तीनाथांची एकादशीला महापूजा होईल तसेच रथोत्सव (Chariot Festival) निघणार आहे त्यामुळे वारकरी वर्गातली नाराजी दूर करण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश मिळत आहे.

- Advertisement -

28 जानेवारी रोजी संत निवृत्तीनाथ यात्रा आहे. या यात्रेला चार ते पाच लाख भाविक वारकरी पायी दिंडीन त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) येतात. पाचशे ते सहाशे दिंडया येतात. यात्रेत टाळ मृदुंगाचा गजरात (gujrat) संत निवृत्तीनाथांचा जयघोष आणि दिंड्यांनी त्र्यंबक नगरी फुलते. पंंचक्रोशी भक्तिरसात न्हाऊन निघते दिंड्या वारकरी तीन दिवस मुक्कामी असतात.

यात्रेत किमान 15 दिवस अगोदर जिल्हास्तरीय प्रशासकीय यंंत्रणेकडून त्र्यंबक नगरपालिकेकडे (Trimbak Municipality) यात्रा तयारी बैठक घेतली जाते. त्यामुळे नगरपालिकेत मंदिरात मोठी लगबग असते. यंदा मात्र असे काही वातावरण नाही. यात्रा नसल्याने यात्रेत व्यवसायला स्थानिक व बाहेरील दुकानदारांचे गाळे जागा मिळवण्यासाठी प्रयत्न नाही ,चढाओढ नाही .

खरेतर पायी दिंडी हा वारकर्यांचा स्थायीभाव आहे पायी दिंडीने चालणे याचा अर्थ शरीराने आणि मनाने परमार्थाची सन्मार्ग वाटचाल करणे होय .पण संकटामुळे मार्ग खुंटला आहे. वारकरी भाविक मुक्कामी असल्यानंतर नागरी सोयी सुविधांसाठीनिर्मळ वारीचा 70 ते 75 रुपये लाख रुपये खर्च शासन नगरपालिकेला दरवर्षी करावा लागतो. असा दोन वर्षाचा दीड कोटी खर्च पालिकेचा वाचला आहे. नगरपालिकेला दुकान भाडे तमाशे आणि करमणूक कार्यक्रम यातून दरवर्षी पंधरा लाखांचे उत्पन्न मिळते. असे 30 लाख रुपये उत्पन्न बुडालेले आहे.

मूळ त्र्यंबक चे असलेले सध्या बाहेर राहणारेमंडळी गावाकडे यात्रेचा हामखास गावी परत येत असतात. पण दोन वर्षे झाली त्यांच्या दर्शन नाही. फार पूर्वी संत निवृत्तीनाथ यात्रापटांगणात भरत असे. निवृत्तीनाथ मंदिर परिसराकडे जाणार्‍या मोकळी जागा म्हणजे यात्रा पटांगण होय.पूर्वी या भागातच करमणुकीचे साधने आणि तमाशाही लागत

पण स्वर्गीय वाळू बाबा ढगें देनेवडीकर चांदवड त्याकाळी उपोषण करून तमाशा यात्रा पटांगणात नको अशी भूमिका घेतली तेव्हापासुन तमाशे पोलीस स्टेशन रोड अन्यत्र जावू लागले. 1991 मध्ये 13 लोकांचे पब्लिक ट्रस्ट मंडळ अस्तित्वात आले. दोन वेळा यात्रा रद्द झाल्याने मंदिराचे 25 लाखाचे देणगी उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेची वारीपासून भाविक वंचित राहिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या