Friday, May 3, 2024
Homeनाशिकबालभारतीकडून पुस्तकांचे वितरण पूर्ण

बालभारतीकडून पुस्तकांचे वितरण पूर्ण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेले दीड-दोन वर्षे ऑनलाईन सुरू असलेल्या राज्यातील शाळा schools 4 ऑक्टोबरपासून ऑफलाईन सुरू झाल्या आहेत. त्यासोबतच शालेय अभ्याक्रमासाठी महत्त्वाचे असलेले पाठ्यपुस्तकांचे वितरण Distribution of books महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण मंडळ, बालभारती Balbharati नाशिक केंद्राकडून जवळपास पूर्ण झाले आहे, अशी माहिती भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांनी दिली.

- Advertisement -

नाशिक केंद्रा अंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात वितरण करण्यात येते. केंद्राने शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 1ली ते 8 वी साठी वेगवेगळ्या पाच माध्यमांतील 91 लाख 32 हजार 781 पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार उपलब्ध झालेल्या जवळपास सगळ्या पुस्तकांचे महापालिका, जिल्हा परिषद केंद्रांवर वितरण करण्यात आले आहे.

यासोबतच खुल्या विक्रीत 10 कोटी 17 हजार 893 इतक्या किमतीच्या पुस्तकांची खासगी व्यापार्‍यांना विक्री करण्यात आली आहे. देशभरात साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी, तसेच प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व विद्यार्थ्याचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठी व त्याद्वारे शिक्षणाचे स्तर सुधारण्यासाठी 2018-19 पासून समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून हे शिक्षण धोरण राबवण्यात येते.

त्यासाठी पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,बालभारती,करते. पाठ्यपुस्तक मंडळाकडून इ. 1ली ते इ. 8 वी करीता मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी,गुजराती, कन्नड, तेलगु व सिंधी अरेबी माध्यमातील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो.

शाळा स्तरावरही विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी पुस्तके दिली जातात. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना बालभारतीकडून पुरेशा पुस्तकांची छपाईच झाली नसल्याने पुस्तकांचे नेहमीप्रमाणे जूनमध्ये वाटप झाले नव्हते. तेंव्हा शाळांनी विद्यार्थ्यांची मागील वर्षाची पुस्तके जमा करून ती मागील इयत्तेतून त्या इयत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येत होती. मात्र आता बालभारतीकडून नवीन पुस्तके उपलब्ध झाली आहेत आणि त्यातच आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या