Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारतळोदा भोई समाज पंच मंडळातर्फे 550 कुटूंबांना फराळ वाटप

तळोदा भोई समाज पंच मंडळातर्फे 550 कुटूंबांना फराळ वाटप

मोदलपाडा Modalpada । वार्ताहर

तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळ (Taloda Bhoisamaj Panch and Navyuwak Mandal) यांच्यातर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून आपुलकीच्या भावनेतून निराधार व गोरगरिबांना दिवाळी निमित्ताने 550 कुटुंबांना (families) फराळ व मिठाई (Faral and sweets) वाटप (Distribution) करून दिवाळी साजरी करण्यात आली.

- Advertisement -

सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी तळोदा भोईसामज पंच नवयुवक मंडळ यांच्यासाठी पुढे सरसावला आहेत. गोरगरीब बंधूंना झोपडीत, ऊस तोड मजूर वर्ग, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना अशा ठिकठिकाणी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहून हृदयापासून आम्हलाही खूप आनंद वाटले या उपक्रमातून अनेकांची दिवाळी आनंदमय झाली.

भोईसमाज पंच व नवयुवक मंडळ तळोदा यांनी पुढाकार घेत तळोदा शहरात गावात वाड्या-वस्त्यांवर आणि रस्त्याच्या कडेला झोपडी बनवून राहणार्‍यांच्या घरात दिवाळीचा सण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दिवाळी साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे त्यांच्या चेहर्‍यावर देखील आनंद दिसला पाहिजे.

या उदात्त हेतूने भोईसमाज पंच व नवयुवक मंडळ तळोदा यांनी या दिवाळीला फराळ वाटपाचा उपक्रम राबविला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे घरात रोजचे जेवणदेखील व्यवस्थित मिळत नाही. अशांच्या घरात दिवाळीच्या वेळेस गोड व चवदार अन्नपदार्थ कुठून येणार असा प्रश्न होता. त्यामुळे सर्वांनी मिळून गरीब, गरजू कुटुंबीयांना फराळ व साहित्य देऊन दिवाळीचा सणात त्यांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

यावेळी तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, तालुका अध्यक्ष धनलाल शिवदे, प्रा.राजेंद्र मोरे, जगदीश वानखेडे, चंद्रकांत साठे, गणेश शिवदे, सचिव धनराज सोनवणे, चंद्रकांत भोई, प्रमोद भोई, गिरीश भोई, सचिन भोई, धीरज भोई आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या