इगतपुरी । Igatpuri
वाढदिवसाला अनावश्यक खर्चाला फाटा देत त्या पैशांतून शाळेला एफ एम रेडिओ भेट दिला आहे.
- Advertisement -
तालुक्यातील जामुंडे शाळेचे मुख्याध्यापक अनिल शिरसाठ यांनी हा आदर्श इतरांसमोर उभा केला आहे.
शिरसाठ यांनी आपल्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च न करता जामुंडे शाळेच्या विद्यार्थ्यांना तीन एफ.एम रेडिओ भेट दिले. त्यांचे कार्य पाहुन व त्यांचे सहकारी शिक्षक यांनीही सहा रेडिओ एफएम भेट देत सहकार्याची भुमिका बजावली आहे.
शिरसाठ यांना जामुंडे गावातील झापांवरील विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याची सल होती. म्हणूनच त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी हा उपक्रम राबविला.