Sunday, May 19, 2024
Homeजळगावगणेश विसर्जनासाठी डयुटीवर असलेल्या पोलीस बंधु भगिनींना फुड पॅकेट वितरण

गणेश विसर्जनासाठी डयुटीवर असलेल्या पोलीस बंधु भगिनींना फुड पॅकेट वितरण

जळगाव : Jalgaon

प्रत्येक नागरीकांस लाभणारी सुरक्षितता व निश्चिंतता यामागे पोलीस बंधु-भगिनी कार्य करीत असतात त्यामुळे आपण सर्व नागरीक प्रत्येक सण व उत्सव शांततेने व उत्साहाने साजरा करीत असतो. या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक उत्तरदायित्व आणि पोलीसांप्रती असलेला आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक (The Jalgaon People’s Co-op Bank) अनंत चतुर्दशी गणेश विसर्जना दिवशी डयुटीवर असलेल्या पोलीस बंधु भगिनींसाठी जेवणाचे वाटप करीत असते. 2013 पासून हा उपक्रम अव्याहतपणे आयोजित केला जातो.

- Advertisement -

9 सप्टेंबर 2022 रोजी गणपती विसर्जनासाठी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी बंधु भगिनी यांना जळगाव पीपल्स बँकेच्या वतीने त्यांच्या ड्युटीच्या जागेवर जाऊन अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे जेवणाचे पॅकेटस्‌‍ देण्यात आले. सदर पॅकेटमध्ये पराठे, छोले भाजी, व्हेज बिरयानी, गुलाब जामुन, समोसा, सलाद व एक लिटरची शुद्ध पाण्याची बाटली असे स्वादिष्ट जेवण हवाबंद डब्यामध्ये पॅकींग करुन देण्यात आले.

सदर फुड पॅकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ शहर पोलीस स्टेशन जळगाव येथे मा.पोलीस अधिक्षक मा.श्री.प्रविण मुंडे (IPS) तसेच मा. जिल्हाधिकारी मा.श्री. अभिजित राऊत (IAS), मा श्री कुमार चिंथा (IPS) सहा.पोलीस अधिक्षक, मा.श्री. विजयकुमार ठाकुरवाड (PI शहर पोलीस स्टेशन) तसेच बँकेचे संचालक मंडळ यांच्या हस्ते पोलीस बंधु भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात फुड पॅकेट देउन वाटपास सुरुवात करण्यात आली.

सदर प्रसंगी बँकेचे चेअरमन श्री.अनिकेत पाटील, चेअरमन-व्यवस्थापन मंडळ श्री.भालचंद्र पाटील, संचालक श्री.सुनिल पाटील, श्री.रामेश्वर जाखेटे, श्री.प्रवीण खडके, श्री ज्ञानेश्वर मोराणकर उपस्थित होते. बँकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमा बददल पोलीस अधिक्षक व जिल्हाधीकारी यांचे हस्ते बँकेचे चेअरमन श्री अनिकेत पाटील व श्री.भालचंद्र पाटील व संचालक मंडळ यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

मा.पोलीस अधिक्षक, शहर पोलीस स्टेशन, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांच्या टीम्स जसे जळगाव शहर पोलीस स्टेशन विलास पवार, सचिन साळुंखे, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन – नरेंद्र दिवेकर, महेश महाले, निलेश पाटील, शनि पेठ पोलीस स्टेशन – नंदकिशोर पाटील, श्री किरण धमके, रामानंद नगर पोलीस स्टेशन – जितेंद्र तावडे, महेश पवार, भुषण भामरे, एमआयडीसी पोलीस स्टेशन – गोपाळ पाटील, करण वंजारी, किरण जोशी, शहर वाहतुक शाखा – योगेश पाटील यांचे सोबत बँकेचे कर्मचारी राजेंद्र सोनार, शिवकुमार शर्मा, निलेश कुळकर्णी, सुधीर भलवतकर, अनिल वाणी, गोविंद खांदे, दिपक खडसे, गणेश राणे, गणेश खांडरे, सतीश पाटील, रविंद्र कोष्टी, वैभव नाईक, रूपेश वाणी, राजेंद्र जोशी, गोपाळ सुतार, अतुल भंगाळे, शांताराम भिल, किशोर कलाल, संतोष ठाकुर, अभय गयावाले, रामा पाटील, दिपक साळी, सचिन चौधरी, राकेश ढाके, भूषण पाटील, मनोज बारी इ. यांनी वाटपाचे काम केले. बंदोबस्ताचे पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जेवण वाटपासाठी पोलीस अधिकारी यांची टीम याकामासाठी कार्यरत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या