Thursday, May 2, 2024
Homeनगरजिल्हा बँक : कार्यकर्त्यांची गर्दी अन् उत्साह

जिल्हा बँक : कार्यकर्त्यांची गर्दी अन् उत्साह

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालया शेजारी असणार्‍या

- Advertisement -

सभागृह आणि लालटाकी येथील बंगल्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. बहुतांशी जागा बिनविरोध निघाल्याने उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते सुटकेचा निश्वास सोडत जमले बुवा असे म्हणत आनंद व्यक्त करत होते.

जिल्हा परिषदेच्या लालटाकी येथील परिसारात सकाळी 11 वाजल्यापासून आ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राजेंद्र नागवडे, सचिन गुजर, संभाजी रोहोकले, ज्ञानदेव वाफारे, अभिजीत लुणिया, रावसाहेब शेळके, यासह राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, उदय शेळके, अमित भांगरे, सिध्दार्थ मुरकुटे, सुरेश गडाख, बाळासाहेब जगताप, काकासाहेब नरवडे, प्रशांत गायकवाड हे खल करत होते.

या ठिकाणी बँकेसाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राजेंंद्र फाळके, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार लक्ष ठेवून होते. कोणत्या मतदारसंघातून कोणत्या कार्यकर्त्याचा अर्ज शिल्लक आहे. तो काढण्याच्या सुचना देत होते. यासाठी राष्ट्रवादीने आदल्या दिवशी पूर्ण तयारी करून ठेवली होती.

दुपारी तीननंतर बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होता. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, सदस्य अनुराधातााई नागवडे, अरूण तनपुरे, राहुल जगताप या ठिकाणी आले. यामुळे मोठी गर्दी झाली. त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात या ठिकाणी आले. बिनविरोध झालेल्या महाविकास आघाडीच्या संचालकांचा मंत्री थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या