Friday, May 3, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात आज 263 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर

नगर जिल्ह्यात आज 263 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 138 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 58 हजार 571 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.74 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 263 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1692 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 49, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 79 आणि अँटीजेन चाचणीत 135 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 32, नगर ग्रामीण 02, नेवासा 01, पारनेर 03, राहाता 03, राहुरी 04, श्रीगोंदा 01 आणि मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 23, अकोले 05, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 06, नेवासा 02, पारनेर 02, पाथर्डी 03, राहाता 11, राहुरी 06, संगमनेर 11, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 05, कँटोन्मेंट 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 135 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 08, अकोले 02, जामखेड 06, कर्जत 07, कोपरगाव 12, नेवासा 16, पारनेर 03, पाथर्डी 20, राहाता 19, राहुरी 08, संगमनेर 08, शेवगाव 08, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 24, अकोले 23, जामखेड 04, कर्जत 02, कोपरगाव 05, नगर ग्रा.25, पारनेर 02, पाथर्डी 09, राहाता 08, राहुरी 02, संगमनेर 15, शेवगाव 06, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 07 आणि कॅन्टोन्मेंट 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 58571

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 1692

* मृत्यू : 913

* एकूण रूग्ण संख्या : 61176

- Advertisment -

ताज्या बातम्या