Friday, May 3, 2024
Homeनगरधक्कादायक ! जिल्ह्यात तब्बल 'ऐवढ्या' बाधितांची रूग्णसंख्येत भर

धक्कादायक ! जिल्ह्यात तब्बल ‘ऐवढ्या’ बाधितांची रूग्णसंख्येत भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी नव्याने उच्चांकाने 810 नवे करोना बाधित रुग्णसमोर आले आहेत. यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 3 हजार 549 झाली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 19 हजारांच्या टप्प्याच्या दिशेने निघाली असून कालअखेर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 18 हजार 831 झाला आहे.

दरम्यान करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 15 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 79.74 टक्के इतके आहे. यासह काल 7 करोना मृत्यूची नोंद झाल्याने एकूण बळींची संख्या आता 267 झाली आहे.

बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 273, अँटीजेन चाचणीत 243 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 294 रुग्ण बाधित आढळले. यातील जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 167, संगमनेर 19, राहाता 1, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 32, कँटोन्मेंट 6, नेवासा 3, श्रीगोंदा 1, पारनेर 4, अकोले 3, राहुरी 18, कोपरगाव 3, जामखेड 2, मिलिटरी हॉस्पीटल 5 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 243 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 9, राहाता 46, श्रीरामपुर 17, कँटोन्मेंट 5, नेवासा 7, श्रीगोंदा 32, पारनेर 14, अकोले 28, राहुरी 16, शेवगाव 24, कोपरगाव 22 आणि कर्जत 23 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 294 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 151, संगमनेर 16, राहाता 14, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 40, श्रीरामपुर 16, कँटोन्मेंट 4, नेवासा 6, पारनेर 6, अकोले 5, राहुरी 10, शेवगाव 2, कोपरगाव 7, जामखेड 11 आणि कर्जत 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

484 रुग्ण घरी

बुधवारी 484 रुग्णांनी बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये मनपा 168, संगमनेर 22, राहाता 25, पाथर्डी 12, नगर ग्रामीण 65, श्रीरामपूर 32, कॅन्टोन्मेंट 10, नेवासा 11, श्रीगोंदा 18, पारनेर 17, अकोले 13, राहुरी 8, शेवगाव 7, कोपरगाव 24, जामखेड 34, कर्जत 16 मिलिटरी हॉस्पीटल 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

सारांश

* बरे झालेली रुग्ण संख्या 15 हजार 15

* उपचार सुरू असलेले रूग्ण 3 हजार 549

* मृत्यू 267

* एकूण रूग्ण संख्या 18 हजार 831

- Advertisment -

ताज्या बातम्या