Friday, May 3, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात दहा मृत्यूसह 363 करोना रुग्णांची वाढ

नगर जिल्ह्यात दहा मृत्यूसह 363 करोना रुग्णांची वाढ

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना रुग्णांच्या संख्येत सोमवारी पुन्हा 363 ने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 13 हजार 586 झाली असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या 10 हजार 620 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 78.17 टक्के असून जिल्ह्यात उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 2 हजार 798 इतकी आहे. दरम्यान, मृतांच्या सरकारी आकडेवारीत काल दहाने वाढ झाली असून जिल्ह्यातील करोना बळीची संख्या आता 168 झाली आहे.

- Advertisement -

सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 40, अँटीजेन चाचणीत 216 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 107 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 15, पाथर्डी 2, नगर ग्रामीण 13, नेवासा 2, पारनेर 5 आणि शेवगाव 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 16 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 13, संगमनेर 25, राहाता 31, पाथर्डी 19, श्रीरामपुर 2, कँटोन्मेंट 16, नेवासा 9, श्रीगोंदा 15, पारनेर 13, राहुरी 3, शेवगाव 10, कोपरगाव 32, जामखेड 20 आणि कर्जत 8 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 107 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 85, संगमनेर 6, राहाता 4, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 1, श्रीरामपुर 1, नेवासा 1, श्रीगोंदा 2, पारनेर 1, अकोले 1, राहुरी 1, शेवगाव 1, आणि कोपरगाव 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

सारांश

* बरे झालेली रुग्ण संख्या 10 हजाार 620

* उपचार सुरू असलेले रूग्ण 2 हजार 798

* मृत्यू 168

* एकूण रूग्ण संख्या 13 हजार 586

- Advertisment -

ताज्या बातम्या