Friday, May 3, 2024
Homeनाशिकबुधवारपासून शाळांची घंटा खणखणणार

बुधवारपासून शाळांची घंटा खणखणणार

नाशिक । Nashik

करोनामुळे तब्बल दहा महिन्यांपासून ‘ लॉक ‘ असलेल्या शाळांची घंटा बुधवारी (दि.२६) खणखणणार आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरु झाल्यानंतर बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण 3365 शाळा आहेत.

त्यापैकी इ.पाचवी ते आठवीपर्यंतच्या 2079 शाळा असून दोन लाख 76 हजार 49 विद्यार्थी शिक्षण घेतात. या वर्गांसाठी शिकवणार्‍या जिल्ह्यतील एकूण 7 हजार 243 शिक्षकांची करोना चाचणीही करण्यात आली. त्यापैकी सुमारे सहा हजार शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले असून, नांदगावचे चार आणि सिन्नरचे दोन शिक्षक कोरोना बाधित आढळले आहेत. त्यांना शाळेत येण्यास बंदी करण्यात आली आहे.

उर्वरीत शिक्षकांचे रिपोर्ट हे मंगळवारपर्यंत येणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर इ.पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षकांचीही करोना चाचणी करुन घेण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने सुरु केले आहे.

पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थितीच्या आधारे शाळांमध्ये चांगलीच गर्दी होईल. त्यादृष्टीने केवळ तीन शिकवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

करोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. त्यादृष्टिने शिक्षकांची करोना चाचणी करण्यात आली असून, पॉझिटिव्ह असलेल्या शिक्षकांना शाळेत येण्यास बंदी केली आहे. प्राथमिक शिक्षकांचीही कोरोना तपासणी करत आहोत.

– राजीव म्हसकर, प्रा.शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या