Sunday, May 5, 2024
Homeनाशिकजिल्हावासियांना पुन्हा धुक्याची अनुभूती, पाहा व्हिडीओ...

जिल्हावासियांना पुन्हा धुक्याची अनुभूती, पाहा व्हिडीओ…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून पुन्हा दाट धुके पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी वाहनचालकांना वाहनाचे दिवे लावून चालावे लागत होते. सकाळी १० वाजेपर्यंत सर्वत्र हीच स्थिती होती. धुक्यातून वाट काढत जिल्हावासीय सकाळचा फेरफटका मारताना दिसले. तसेच याचा फटका रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे…

- Advertisement -

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी नाशिक, निफाडसह विविध भागात सकाळी दहा वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली होती. यामुळे मानवी जीवनाबरोबरच, पशुधन यांचे आरोग्य बिघडण्याबरोबरच कांदा, द्राक्ष, फळे, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसणार आहे.

आज धुके का पडले?

  धुके पडणाऱ्या ठिकाणी, त्यावेळी, इतर भागापेक्षा तुलनात्मक असलेल्या अधिक आवश्यक खालील गोष्टी कारणीभूत असतात.

  १ पहाटेच्या किमान तापमानात घट

  २ निरभ्र आकाश

  ३ पाणस्थळ भाग

  ४ समुद्र सपाटीपासुन कमी उंची

  ५ त्यावेळी  हवेचा उच्च दाब

  ६ वाढलेली सापेक्ष आर्द्रता

  ७ शांत वारा

  ८ जमिनीत अतिरिक्त वाढलेले ओलाव्याचे प्रमाण

सध्या धुके पडत असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीक पाणी भरणी जोरात असून पाट पाण्यांचे आवर्तने सुरु आहेत. यामुळे वरील सर्व गोष्टी जुळून येत आहेत.

–  माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ञ

- Advertisment -

ताज्या बातम्या