Thursday, May 9, 2024
Homeनाशिकझुरळ प्रकरणावर जिल्हा शल्यचिकित्सकांची कानउघडणी

झुरळ प्रकरणावर जिल्हा शल्यचिकित्सकांची कानउघडणी

नाशिक । Nashik

जिल्हा रुग्णालयातील झुरळ प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतली असून जिल्हा रुग्णालय हे गरीबांसाठी महत्वाचे असल्याने स्वच्छतेसह इतर बाबींमध्ये तात्काळ सुधारणा करा असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना देत त्यांची कानउघडणी केली.

- Advertisement -

रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात झुरळ निघाल्याचे प्रकरण गाजत आहे. तसेच १३ वर्षीय मुलीचे वय कागदोपत्री २० दाखवून तिची प्रसुती करण्यात आली. या सर्व प्रकरणामुळे जिल्हा प्रशासन रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आला.

महिला प्रसूती कक्षामध्येच झुरळ आढळून आल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच करण्यात आली. पण तक्रारींची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. माध्यमांतून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी झुरळ निघाले पण ते नवजात शिशू कक्षातील नसून, प्रसूती कक्षातील असल्याचे स्पष्टीकरण दिले.

शिवाय हे रुग्णालयातलेच असतील असे नाही, तर रुग्णांचे नातेवाईक अन् रुग्ण आपले सामानही घेऊन येतात. त्याद्वारेही येण्याची शक्यता असल्याचे सांगत या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाचा कुठलाही दोष नसल्याचे अजब उत्तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिले.

शिवाय झुरळ आले कुठून त्याची यंत्रणेमार्फत करु असे गजब उत्तर दिले. अखेर या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी झुरळ तपासणीचे नमुने घेऊन प्रयोगशाळा किंवा कुठेही पाठविण्यापेक्षा त्यात सुधारणा करा. झुरळं नाहीसी कशी होतील याची उपाययोजना करा.

मुलभूत सुविधांसह सुरक्षेच्या दृष्टीने गरज असल्यास आवश्यक बाबींची व्यवस्था करा. त्यासाठी मंजूरी आहे, असे समजून उपाययोजना केल्यानंतर कार्योत्तर मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविण्याची मुभा देखील यावेळी डॉ. रावखंडे यांना देत त्यांची कानउघडणी करत कामकाजात सुधारणा करा असा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या