Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedचटकदार पापड रोल!

चटकदार पापड रोल!

साहित्य : उडदाचे सहा पापड, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी उकडलेले मटारदाणे, अर्धी वाटी नारळ,अर्धी वाटी बारीक शेव, काजू, बेदाणे, 4-5 हिरव्या मिरच्यांचे वाटण, लिंबुरस, मीठ, साखर, तळणीसाठी तेल.

कृती : मटारदाणे जरासे ठेचून घेऊन त्यामध्ये पापड सोडून सर्व पदार्थ एकत्र करून सारणाचे सहा भाग करावेत.

- Advertisement -

एका ताटात पाणी घेऊन सर्व पदार्थ व पापड त्यात 3-4 मिनिटे भिजवून ठेवावेत. ते निथळल्यानंतर पोळपाटावर ठेवून प्रत्येक पापड कोरड्या फडक्याने टिपून घ्यावा. त्यावर सारणाचा एक भाग ठेवून पापड वळकटीप्रमाणेे दुमडून घ्यावा.

नंतर थोडासा पाण्याचा हात लावून दोन्ही कडा आतल्या बाजूला वळवून चिकटवाव्यात. आता रोल सर्व बाजूंनी बंद होईल. नंतर सर्व रोल तयार करून गरम तेलात मंद गॅसवर तळून घ्यावेत. गरमागरम रोल सॉसबरोबर सर्व्ह करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या