Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedदिवाळी तुझ्यासाठी या नविन ओळी.....

दिवाळी तुझ्यासाठी या नविन ओळी…..

शुभांगी देशमुख

दिवाळी,

- Advertisement -

तुझ्यासाठी या नविन ओळी,

दिन दिन दिवाळी

गायी म्हशी ओवाळी

दिन दिन दिवाळी

नुसती धमाल हा सणच फराळी

दिन दिन दिवाळी

चमक धमक आणि लाईटींगच सारी

वर्षातून येणारा प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी

जेव्हा जातात सारीची सारी नातवड आजोळी

दिवाळी म्हणजे चोहीकडे आनंदी आनंद

सडा रांगोळ्यानी दरवळतो चोहीकडे सुगंध

दिवाळी ला साफसफाईची नुसती घाई

चकली – चिवडा आणि फराळाची वाट बघताय ताई

दिवसरात्र येथे एक येतात, आणि चंद्र-तारे निघुनी जाती

तिच तर कमी पूर्ण करण्यासाठी लखलखाट पणत्या प्रज्वलित होती

आता तर सध्या नविनच ट्रेण्ड चाललंय

इलेट्रिक दिव्यानी प्रकाशावर बसवलाय ताबा

आणि मग दिसतेय काय ? जिकडे तिकडे चोहीकडे,

पणतीऐवजी लाईटिंगचं दिसे

लहानण्यापासून ते मोठ्यापर्यंत

सर्वांनाच बाजारात जाण्याची मोठी घाई

छान छान फराळासोबत नवे कपडे घेण्याची घाई

सण हा मोजून चार-पाच दिवसाचा

आनंद मात्र देऊन जाई वर्षभराचा

दिवाळी म्हणजे खरेदी आणि नुसती खरेदीचा आनंद,

रंगीबिरंगी कपडे, तोरणे आणि फटाक्यांची आतिषबाजी

गायी-म्हशींना देखील मोठा मान दिला जातो

वर्षभर मिळणाऱ्याा दूध – तुपासाठी दिवा

आरतीने सोहळा केला जातो

सासरी गेलेल्या बहीणीसाठी

तर हा सण फार अनोखा बहिणीच्या भेटीसाठी

तरसतो प्रत्येक भाऊ छोटा आणि मोठा

धनधान्यापासून ते पैशा-अडक्यापर्यंत

प्रत्येकाला मोठा मानाचा असतो मुुजरा

स्थायी रूपाने लक्ष्मीचा असावा वावर

म्हणून तर असतो दिवाळी सण हा

नरक-चतुर्दशीच्या निमित्ताने उदयास येते

शेवटी अंतत: जिंकण्यास नेहमी सत्यच असते सोबत

घरा घरात जळतो पणती आणि दिवा

तेज लखलखाटाने उजळुन निघु दे

यशाचे धूर मोठे

येवो उदयास नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचे साठे

हे परमेश्वरा

घराघरांतून उजळून निघु दे

स्वच्छता आणि समृद्धीचे धूर

नरकासुराच्या वधाप्रमाने होऊ दे

अविचार आणि कपट चुर चुर……

शुभांगी देशमुख, नायगाव, ता. यावल

- Advertisment -

ताज्या बातम्या