Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedपरिचारिका

परिचारिका

रावसाहेब जाधव

खरे तर,

- Advertisement -

नसतेच ती साधारण स्री…

ती असते,

आश्वासक भयमुक्तीचा साक्षात्कार

आणि रुग्णालयातील संचार

वेदनेवरील शामकता सोबत घेऊन

वेदनाळल्या मनांवर घातलेली फुंकर

ती थोपटते आई होऊन

आश्वासक असते सखीसारखी

आणि होते आधार

रूग्णशय्येवर विसावल्या गलितगात्रांचा

तीच तर असते उभी मध्यभागी जीवनमृत्यूच्या,

घेऊन हाती जीवनकलश संजीवनीचा

औषधांच्या रुपात…

आणि

असतेही ती

दुखर्‍या मनाच्या पट्ट्या बदलताना

मबरे होण्याचेफ आश्वासन देत

पुन्हा सुटू शकणार्‍या मबँडेजफची

खुणगाठही…

पण,

विज्ञानाला मानवतेच्या बाळंत्यात गुंडाळताना

अंगावर चढवलेल्या कवचातूनही

पत्करावेच लागतात तिला

धोके संसर्गाचे कधीकधी

कारण ती निभावत असते कर्तव्य

विसरून अस्तित्व स्वतःचे…

रावसाहेब जाधव

(चांदवड) जि. नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या