Thursday, May 2, 2024
Homeजळगावघराघरात दिवाळीच्या फराळाची लगबग

घराघरात दिवाळीच्या फराळाची लगबग

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अवघ्या तीन ते चार दिवसांवर दिवाळीचा सण (Diwali festival) येऊन ठेवलेला आहे. दिवाळी जशीजशी जवळ येऊ लागली आहे. तशीतशी महिलांमध्ये (Women) विविध फराळ (Faral) तयार करण्यासाठी लगबग (Almost) सुरु झालेली आहे.

- Advertisement -

यंदाच्या दिवाळीपूर्वीच गॅससिलिंडरचे दर हजारीपर्यंत येऊन ठेवले आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत जीवनाश्यक वस्तूंच्या भावात 10ते 15 टक्क्कयांनी फराळाच्या वस्तूंच्या किंमतींमध्ये दरवाढ झाल्याने फराळाला महागाईची फोडणी दिली जात आहे. परिणामी फराळ तयार करणार्‍या महिलांचा बजेट कोलमडणार आहे. तरीही महिला वर्गाकडून फराळ तयार करण्यासाठी मोठी लगबग सुरु झालेली आहे.

फराळासाठी लगबग

यंदाच्या दिवाळीत शेव, पापडी, बर्फी, चिवडा, लाडू, शंकरपाळे, चकल्या, सांजोरी, अनारसे अशा विविध प्रकारचे पदार्थ बनविण्यासाीठी लगबग सुरु आहे. कॉलनी किंवा उपनगरच्या विविध भागात कारागिराकडून. फराळाचे पदार्थ बनविण्यात येत आहे. 80 ते 100 रुपये किलो दराप्रमाणे पदार्थ तयार करण्यासाठी दर आकारले जात आहे. यंदा तेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली त्याचप्रमाणे मजुरीच्या दरात 20 रुपयांनी वाढ केली असल्याची माहिती जोगणीयॉ केटर्सचे संचालक सूरज महाराज यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

दिवाळीचा सण अवघ्या तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपलेला असल्यानेे बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे. बाजारपेठेतून कच्चे साहित्य खरेदी करुन काही महिलांकडून कारागिराकडून विविध फराळाचे साहित्य तयार करण्यासाठी लगबग सुरु आहे. तर काही महिला घरच्या घरीच विविध फराळाचे साहित्य तयार करण्याकडे कल दिसून येत आहे.

रेडिमेड फराळाला पसंती

तेल, बेसन, चिवडासह इतर वस्तूंच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बहुतांश महिलांसह नागरिक रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. मलईची मिठाई -400 रुपये किलो, काजू कदली-700 रुपये किलो, मिठाई- 180 रुपये किलो,शेव- 180 रुपये, चकली- 250 रुपये किलो, शंकरपाळे -180 ते 250 रुपये किलो असे प्रकारे रेडिमेड फराळांचे दर असून अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदाची दिवाळी नागरिकांसह फराळ तयार करणार्‍यांना साधारणपणे जात असल्याचे सूरज महाराज यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या