Friday, May 3, 2024
HomeUncategorizedदिवाळी अंक २०२० कविता : वाघाचा मॉल

दिवाळी अंक २०२० कविता : वाघाचा मॉल

वाघाने थाटलाय जंगलात मॉल

गिर्‍हाईक येत एक एक जहाल

- Advertisement -

सेल्समन साठी शेळ्याचा ताफा….

वाघाने थाटलाय जंगलात मॉल

गिर्‍हाईक येत एक एक जहाल

सेल्समन साठी शेळ्याचा ताफा

मालकाला पाहून टाकतात धापा

मॉलमध्ये आलं माकडाच टोळकं

चोरतात टोप्या करून घोळकं

हरिणी आली पिल्लाना घेऊन

घेतला फ्रॉक अन आईला गाऊन

हत्तीला हवा डॉलरचा बनियन

फिट है बॉस तरी भरेना मन

अस्वलाला साबणावर शांपू फ्री

हळूच ओढतो उधारीची री

सशाला हवा युनिफॉर्म काळा

ऐकून हसतात सारे खळाखळा

लांडगे घोटाळले सेल्समन जवळ

शेळ्यांना आली पाहून भवळ

कोल्हाला घ्यायचा मोबाईल छान

मिसकॉल देऊन उडवतो ध्यान

कुत्र्याला हवा कंबरेचा पट्टा

घातल्यावर करतात सारेच थट्टा

घोड्याची मागणी वाकींगचे शूज

फिटिंगला बसेना झालेत लूज

मनी मऊ आली करून मेकप

रूप तिचे पाहून वाढला खप

गाढवाला हवे कानातले छान

आरश्यात पाहून मारतो ताण

उंटाला घ्यायचा बंजारा झगा

सेल्समन म्हणतात क्वालिटी बघा

जिराफला आवडली लेगिंग्ज तंग

घातल्यावर बदलला चालण्याचा ढंग

वाघाचा धंदा झाला फार

किरकोळ व्यापारी मेले ठार

– गोकुळ वाडेकर, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या