Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्रीभृणहत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील सहा महसूल विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे सहा मान्यवर महिलांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.

- Advertisement -

सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासनस्तरावरील निवड समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केले.

पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये पुणे विभागातून जनाबाई सिताराम उगले, नाशिक- डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, कोकण – फुलन जोतीराव शिंदे, छत्रपती संभाजीनगर- मिनाक्षी दयानंद बिराजदार, अमरावती – वनिता रामचंद्र अंभोरे, नागपूर विभागातून शालिनी आनंद सक्सेना यांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त महिलांना रुपये १ लाख आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...