Friday, May 3, 2024
Homeनगरकेडगावाचे पाणी इतर भागाला देऊ नका

केडगावाचे पाणी इतर भागाला देऊ नका

अहमदनगर (प्रतिनिधी) –

केडगाव उपनगर मागील काही वर्षांपासून पाण्यापासून वंचित होते. स्थानिक नगरसेवकांनी प्रयत्न केल्यानंतर हा प्रश्न काही

- Advertisement -

अंशी मार्गी लागला. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ लागला. मात्र, अजूनही केडगावमधील काही भागांत 5 ते 6 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. केडगावमधील काही ठिकाणी पाणी मिळते, तर काही ठिकाणी मिळत नाही.

केडगावला मिळणार्‍या पाण्यात उपनगराने वाटा मागितल्याचे समजते. हा वाटा देण्यास केडगावमधील आम्ही सर्व नगरसेवक विरोध करीत आहोत, अशा आशयाचे निवेदन नगरसेविका श्रीमती सुनीता कोतकर यांच्या वतीने संग्राम कोतकर यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले.

केडगावला पूर्ण दाबाने पाणी मिळावे, त्याबरोबरच इतरांनाही पाणी मिळावे, ही आम्हा सर्व नगरसेवकांची इच्छा आहे. शिवाजीनगर, कल्याण रोड येथील नागरिकांना पाणी मिळायलाच हवे. तो त्यांचा हक्क आहे.

मात्र, केडगावचे पाणी कमी करून इतरांना पाणी देण्याचा प्रयत्न झाल्यास तो आम्ही नगरसेवक एकत्रितरित्या येऊन हाणून पाडू. शिवाजीनगर, कल्याण रोड येथील नागरिकांना स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी देण्यात यावे. यासाठी त्या भागातील स्थानिक नगरसेवकांबरोबर आम्ही देखील पाठपुरावा करीत आहोत. केडगाव जलवाहिनीतून ड्रिम सिटीला दिलेले पाणी बंद करावे. कोणाच्या सांगण्यावरून ड्रिम सिटीला पाणी दिले, याची माहिती देण्यात यावी.

केडगावच्या वाट्याचे पाणी इतर भागाला देऊ नये, अशी आमची आपणास विनंती आहे. या प्रश्नाबाबत आयुक्तांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. प्रसंगी केडगावमधील नागरिकांसमवेत महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. होणार्या सर्व परिणामांची जबाबदारी आयुक्तांची असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या