पुणे | Pune
‘आपल्या कार्यात प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तीला देव मानायचे की नाही, हे लोकच ठरवतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला देव म्हणू नका…’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात केले. पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. भागवत बोलत होते.
हे ही वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद
आपलं जीवन जितकं चांगलं करता येईल तितके करावे. प्रत्येकाने देववाद झालं पाहिजे. मात्र मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या. क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले.
हे ही वाचा : पाण्याच्या वादातून खून करणार्या आरोपीला जन्मठेप
या कार्यक्रमात बोलताना मणिपूरमधील परिस्थितीबाबत बोलताना संघ प्रमुखांनी चिंता व्यक्त केली. “मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर आहे कारण तेथे सुरक्षा नाही. स्थानिक नागरिकही त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. तिथे व्यावसायासाठी किंवा कामासाठी गेलेल्या नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उभे आहेत. तिथून पळून गेले नाहीत. ते पक्षभेद विसरुन सर्वांसाठी काम करत आहेत,” असा दावा त्यांनी केला.
हे ही वाचा : लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून तरुणाला मारहाण